LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बालिकेचा मृत्यू : तिघे एएसआय निलंबित

मंडया : तीन वर्षीय बालिकेचा अपघाती मृत्यू प्रकरणी तिघां सहाय्यक फौजदारांना निलंबित करण्यात आले आहे.
ट्रॅफिक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मंड्या शहरात जुने बेंगळूर-म्हैसूर महामार्गावर स्वर्णसंद्रजवळ झालेल्या अपघातात रितिक्षा नावाच्या तीन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. शहरात या घटनेचे तीव्र उमटताच मंड्याचे पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन बालदंडी यांनी तात्काळ पावले उचलत हेल्मेट तपासणी करत असलेल्या तीन एएसआय अधिकाऱ्यांना निलंबित केले.


 

मृत बालिका रितिक्षा ही मद्धूर तालुक्यातील गोवरनहळ्ळी येथील रहिवासी अशोक आणि वाणी या दांपत्याची मुलगी होती.
गावातील कुत्र्याने चावल्यामुळे ते तिला उपचारासाठी मंड्याच्या मिम्स रुग्णालयात नेण्यात येत होते. यावेळी मंड्या शहरातील नंद सर्कल भागात ट्रॅफिक पोलिसांनी हेल्मेट तपासणीसाठी त्यांची दुचाकी अडविली. दुचाकी अडविण्यासाठी पोलीस अचानकपणे दुचाकीच्या समोर आल्याने अशोक यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी कोसळली आणि दुचाकीवरील अशोक आणि रितिक्षा खाली कोसळली. याचवेळी मागून येणाऱ्या टेम्पोने रितिक्षावर धडक दिली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेनंतर संतापलेल्या रितिक्षाच्या कुटुंबीयांनी बालिकेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन सुरू केले. नागरिकांनीही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला असून पोलिसांच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध केला आहे. काही वेळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. याची गांभीर्याने दखल घेत मंड्याचे एसपी मल्लिकार्जुन बालदंडी यांनी तात्काळ कारवाई करत एएसआय जयराम, नागराज आणि गुरुदेव यांना निलंबित केले.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती