LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

वाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?

बेळगाव : वाढदिवसानिमित्त कुटुंबीय, होणारा पती आणि मित्रमैत्रिणींनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र नेमकं काय घडलं कुणालाच समजलं नाही आणि विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.


कावेरी उमेश नायक (वय 21) असे जीवन संपविलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हुक्केरी तालुक्यातील कटबळी गावची रहिवासी होती.
बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारी ही विद्यार्थिनी बेळगावातील आझम नगर येथील वसतीगृहात राहून शिक्षण घेत होती.
आज ती कॉलेजला न जाता दिवसभर वसतीगृहातच होती. सकाळपासून दुपारपर्यंत ती सर्वांशी बोलत होती. मात्र दुपारनंतर तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. रात्री जेवण करण्यासाठी बोलावण्यास गेलेल्या स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशयाने खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता कावेरीने गळफास घेतल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच तिचे पालक, एपीएमसी पोलीस आणि संबंधित अधिकारी वसतिगृहात दाखल झाले व पाहणी केली. वाढदिवसाच्या दिवशीच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच कावेरीचा एका पोलीस कॉन्स्टेबलसोबत साखरपुडा झाला होता. होणाऱ्या पत्नीच्या निधनाने त्याला अश्रू अनावर झाल्याचे सांगितले गेले.
एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीआयएमएस रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती