हुबळी : नागरिकांचे हरवलेले 27 मोबाईल शोधून पोलिसांनी मोबाईल मालकांकडे परत केले. हुबळी टाऊन पोलीस ठाण्यात मोबाईल मालकांकडे हे मोबाईल परत करण्यात आले.
पोलीस निरीक्षक मल्लाप्पा मद्दी, फौजदार अनिल कुंभार, सहाय्यक फौजदार भीमसी मादरकांडी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे मोबाईल परत करण्यात आले.
हरवलेल्या मोबाईलसंदर्भात तक्रार दाखल केलेल्या नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
