LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

प्लास्टिक कारखान्याला लागली भीषण आग

बेळगाव : प्लास्टिक कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांच्या प्लास्टिक वस्तू व यंत्रसामग्री जळून खाक झाली. बेळगाव शहरापासून जवळच असलेल्या होनगा औद्योगिक वसाहतीत काल उशिरा रात्री ही घटना घडली.


रात्रीच्या सुमारास होनगा औद्योगिक वसाहतीतील डांगे प्लास्टिक कारखान्यात अचानक आग लागली.


कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य असल्याने काही क्षणांतच आगीने संपूर्ण परिसर व्यापला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. मात्र तोपर्यंत लाखो रुपयांच्या प्लास्टिक वस्तू व यंत्रसामग्री आगीत जळून खाक झाली. आग रात्रीच्या सुमारास लागल्याने कारखान्यात कोणी नव्हते. यामुळे जीवितहानी झाली नाही.


अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आगीच्या लपेट्यात नजीकचे कारखाने आले नाहीत आणि मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या आग नेमकी कशी लागली आणि आगीत किती किमतीचे नुकसान झाले याचा तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती