LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला '

फोंडा : दिल्लीला जाण्याचा बेत रद्द करून बेळगावहून फोंडयाला चाललेल्या डॉ. केतन भाटीकर यांनी अनमोड घाटात काही काळ गाडी थांबविण्यास सांगितली. यावेळी त्यांचा मोबाईल हातातून निसटला आणि खाली झुडपात पडला. मोबाईल उचलण्यासाठी त्यांनी झुडुपात हात घातला आणि काळ बनून बसलेल्या विषारी सापाने त्यांच्या हाताचा चावा घेतला.


घटना लक्षात येताच त्यांच्या वाहन चालकाने त्यांना गाडीत बसवून
तातडीने धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. पण, काहीच उपयोग झाला नाही.
वेळ आणि काळ बनून झाडीत बसलेल्या सापाने गोव्याचे प्रख्यात फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक सामाजिक नेत्याला पाहता पाहता हिरावून नेलं.


पक्षानं एक सक्षम आणि लोकप्रिय नेता गमावला ' असे खानापूरच्या माजी आमदार आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


अलीकडेच त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजप नेते दिवंगत रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या विजयाबाबत चांगल्या अपेक्षा व्यक्त होत होत्या; मात्र उच्च न्यायालयाच्या तात्पुरत्या स्थगितीमुळे निवडणूक रद्द करण्यात आली.
मागील निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर भाजपचे नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या वेळी पोस्टल मतांच्या आधारे रवी नाईक यांनी 130 मतांनी विजय मिळवला होता, तर डॉ. केतन भाटीकर यांना थोड्याशा मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक सक्रिय आणि लोकप्रिय नेता गमावल्याचे कार्यकर्त्यांतून सांगितले जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती