LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

तिघां लहान मुलांसह महिलेने केली तलावात उडी घेऊन आत्महत्या ..!

बळळारी : पती-पत्नीमधील भांडण मातेसह


[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]

तीन निष्पाप मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.
भांडणामुळे संतापलेल्या पत्नीने आपल्या तिघां मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.
बळळारी जिल्ह्यातील कुरुगोडू तालुक्यामधील बरदनहळ्ळी गावात ही घटना घडली.


सिद्धम्मा (वय 30) असे मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सिद्धम्मा ही मूळची बेळगावची असून सध्या ती बरदनहळ्ळी येथे आपल्या पतीसह वास्तव्यास होती. पती कुमारसह ती शेळ्या-मेंढ्या पालन करायची. बरदनहळ्ळी येथील राघवेंद्र यांच्या शेतात ते तात्पुरती वस्ती करून वास्तव्यास होते.
पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि वाद विकोपाला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिद्धम्मा आपल्या तीन मुलांना घेऊन शेताकडे गेली. सायंकाळी उशीर झाला तरी पत्नी आणि मुले परत न आल्याने कुमारने शोधाशोध चालविली. यावेळी शेळ्या हौदाजवळ उभ्या असल्याचे पाहून त्याला संशय आला. त्याने पाण्यात उतरून शोधाशोध केली असता, पत्नी व तिघा मुलांचे मृतदेह आढळून आले.
पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून सिद्धम्माने हे टोकाचं पाऊल उचललं. तिने अभिग्ना (वय 8), अवणी (वय 6) आणि आर्य (वय 4) या मुलांसह शिवारानजीकचा तलाव गाठून मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा कयास आहे.
पोलिसांनी नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिली असून सिद्धम्माच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कुरुगोडू पोलिस अधिक तपास करीत आहेत.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती