LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करू नका ' : विजयेंद्र यांचे सरकारवर ताशेरे

बेळगाव : "शेतकऱ्यांच्या समस्या वेदनादायी आहेत. त्यांच्या अश्रूंवर राजकारण करू नका. पक्षीय मतभेद विसरून सर्वांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांच्या समर्थनात उभे राहणे, गरजेचे आहे ," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र म्हणाले.

विजयेंद्र यांनी राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सरकारवर सडाडून टीका केली. ' सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना त्वरित प्रतिसाद द्यावा आणि योग्य निर्णय घ्यावेत. सरकारने कसे वागावे हे सरकारने समजून घेतले पाहिजे," असेही ते म्हणाले.


" मी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावला आलो आहे. मला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे - जेव्हा याच बेळगावमध्ये विठ्ठल अरबावी या शेतकऱ्याने आत्महत्या केली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आंदोलन सुरू केले होते आणि उसाला प्रति टन 150 रुपये अतिरिक्त भाव दिला होता. भाजप शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे, असेही विजयेंद्र म्हणाले.
' राज्यात दरवर्षी सुमारे 6 दशलक्ष टन ऊसाचे उत्पादन होते. आणि त्यातून सरकारला 50 ते 60 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत न देणे हे राज्य सरकारचे अपयश आहे,” असेही विजयेंद्र म्हणाले.


भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, आमदार अभय पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि भाजप जिल्हा नेते तसेच आजी-माजी आमदार याप्रसंगी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती