LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

दीदी म्हणाल्या, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही

कोलकत्ता: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत धक्कादायक जनमत मिळाल्यानंतर दारुण पराभव झालेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK - द्रमुक) पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र,पश्चिम बंगालमध्ये पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आलेल्या टीएमके च्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी
“ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे स्पष्टपणे म्हटले आहे.
निवडणुकीतील पराभवानंतर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
त्या म्हणाल्या, ' हा जनादेश नाही, तर ही एक कटकारस्थानाची (षड्यंत्रची) फलश्रुती आहे.” यामुळे
माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच निर्माण होत नाही'. आम्ही जनतेच्या मतांनी हरलो नाही, तर कटकारस्थानामुळे हरलो आहोत. मी हरलेली नाही... त्यामुळे मी लोकभवनात जाणार नाही. संविधानानुसार ते पुढील कारवाई करू शकतात,” असे ममता दीदींनी स्पष्ट केले आहे. 
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची (टीएमसी) लढत ही भाजपविरोधात नव्हती, तर भाजपाच्या बाजूने काम करणाऱ्या निवडणूक आयोगाविरुद्ध होती, असे सांगत त्यांनी निवडणूक आयोगावर शाब्दिक प्रहार केला आहे.
मतमोजणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करत, सुमारे 100 जागांवर आमची फसवणूक झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, पक्षाचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी मतमोजणी जाणीवपूर्वक धीम्या गतीने करण्यात आली, असेही त्यांनी म्हटले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती