LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

...मला जशास तसं उत्तर द्यायलाही येतंय : लक्ष्मण सवदी यांनी नाव न घेता दिला रमेश जारकीहोळी यांना ईशारा

अथणी : माजी उपमुख्यमंत्री आणि अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी आणि विद्यमान आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यातील शाब्दिक वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.
या दोघांत एक-दुसऱ्याचे नाव न घेता शाब्दिक वाद-प्रतिवाद सुरूच आहे.


रमेश जारकीहोळी यांच्या एका शाब्दिक टोल्याला प्रतिटोला लगावताना आमदार लक्ष्मण सवदी यांनी, '
मी गावात वाढलेलो असून कन्नड माध्यमातून शिक्षण घेतलेला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला ट्रॅक्टर चालवायलाही येते आणि प्रत्युत्तर द्यायलाही येते. कुणी अन्याय करायला आला तर त्याला जशास तसं उत्तर द्यायलाही मला येतं ' अशा शब्दांत आमदार
सवदी यांनी नाव न घेता रमेश जारकीहोळी यांच्यावर शाब्दिक टीकास्त्र सोडले आहे.
अथणी तालुक्यातील तेलसंग गावात विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सवदी यांनी आपल्या विरोधात अनावश्यक राजकीय टीका करणाऱ्यांना इशारा दिला.
“मी गावात वाढलो, कन्नड माध्यमातून शिकलो. शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. ट्रॅक्टर आणि बैलांसोबत वाढलेलं आयुष्य हीच माझी ओळख आहे. पण कुणी अन्याय केला तर त्याला योग्य प्रत्युत्तर द्यायलाही मी सक्षम आहे,” असे ते म्हणाले.
अलीकडेच अथणी मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या रमेश जारकीहोळी यांनी पुढील निवडणुकीत सवदींना पराभूत करून पुन्हा ट्रॅक्टर चालवायला पाठवू, अशा आशयाचे वक्तव्य केल्याची चर्चा आहे.
यावर प्रत्युत्तर देताना सवदी म्हणाले, “शेतकऱ्याचा मुलगा असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अथणीला कुणाच्या प्रभावाखालील दुसरा तालुका बनवण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल, तर ते येथे कधीच शक्य होणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, अथणी ही केवळ शेतकऱ्यांची भूमी नसून बुद्धिजीवी, वैज्ञानिक आणि सामाजिक भान असलेल्या लोकांचा परिसर आहे. “अतिप्रक्षोभक भाषा वापरणाऱ्यांना जनता स्वतः उत्तर देईल,” असेही त्यांनी म्हटले आहे.
“मीदेखील त्यांच्या भाषेत बोलू शकतो. पण तसे केले तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक उरणार नाही,” असा टोलाही सवदी यांनी लगावला.
यावेळी त्यांनी आपल्या राजकीय ताकदीबाबत आणि जनसमर्थनाबाबत आत्मविश्वास व्यक्त करत, कोणत्याही राजकीय लढाईला न घाबरता सामोरे जाईन, असे स्पष्ट केले.
बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सवदी आणि जारकीहोळी गटांमध्ये अनेक वर्षांपासून तीव्र राजकीय स्पर्धा असून, स्थानिक संस्था आणि सहकारी क्षेत्रातील निवडणुकांमध्येही दोन्ही गट एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जातात.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती