LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरजातीय विवाह ही काळाची गरज : शिवाजी हसनेकर

बेळगाव : आंतरजातीय विवाह होणे हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी गरजेचे आहे. आपल्या देशातून जातीयता  नाहीशा करायच्या असतील तर ‌, आंतरजातीय विवाहाचे आपण स्वागतच केले पाहिजे. कारण जातीयता समाज विकासाला बाधकच आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी हसनेकर यांनी केले.


बेळगाव जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने जागर विवेकाचा या सदराखाली आयोजित केलेल्या व्याख्यानात आंतरजातीय विवाह काळाची गरज, या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.


गिरीश संकुलनामध्ये शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड अनिल आजगावकर हे होते.
प्रारंभी अनिसचे कार्यकर्ते प्रा‌. अशोक आलगोंडी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व व्यासपीठावरील पाहुण्यांचे स्वागत केले.
श्रीयुत हसनेकर पुढे  म्हणाले , आंतरजातीय विवाहाला चालना देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1889 ला आपला दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत फुले याचा विवाह सत्यशोधक समाजाचे नेते ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांची मुलगी राधा उर्फ लक्ष्मी हिच्याशी केला. हा विवाह आधुनिक भारतातील पहिला आंतरजातीय विवाह होता.
यापूर्वी संत बसवेश्र्वरांनी बाराव्या शतकात , जाती अंतासाठी तत्कालीन समाज व्यवस्थेला व राज सत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह लावून दिला. हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसाचे होते.
राजर्षी शाहू महाराजांनी तर महात्मा फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन 1917 मध्ये आंतरजातीय विवाहचा कायदाच केला. फक्त कायदा करूनच ते थांबले नाहीत , तर आपली चुलत बहीण चंद्रभागा हिचा विवाह कागलच्या धनगर घराण्यातील युवकाशी केला. याच्याही पुढे जाऊन शाहू महाराजांनी, कायदा करत असताना हिंदू जैन अशी 25 जोडप्यांची लग्न एकदम लावली. त्या काळात असे करणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखे होते.
याशिवाय महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार इ . व्ही . राम स्वामी, सी .एन . अन्नदुराई या आणि यासारख्या समाजसुधारकांनी आंतरजातीय विवाहाला चालना देऊन समाजात समानता वाढीस लावली.
आपल्या पुराणात इतिहासात आंतरजातीय विवाह झाल्याची उदाहरणे आहेत , तर मग आताच्या 21व्या शतकातील प्रगल्भ समाजात आंतरजातीय विवाह का होऊ नयेत ? असा प्रश्न शेवटी त्यांनी उपस्थित केला.
‌‌ याप्रसंगी अनिसचे कार्यकर्ते एस .आर .पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर कॉम्रेड अनिल आजगावकर यांनी अध्यक्ष समारोप केला .
यावेळी इंद्रजीत मोरे, श्रीयुत ओऊळकर , मधु पाटील, संजय बंड, संजय मुतगेकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. अशोक आलगोंडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर , अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते जे . पी. आगशीमनी यांनी आभार मानले.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती