LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

खानापूर : गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. आज शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य परिसरातील गवाळी भागात ही घटना घडली आहे.


गवाळीचे शेतकरी प्रकाश कृष्णा गुरव (वय 55) हे आपल्या पत्नीसह शिवाराकडे चालले होते. यावेळी रस्त्याशेजारच्या झुडुपात उभ्या असणाऱ्या गवी रेड्याने प्रकाश गुरव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रकाश यांच्या हाताला आणि कंबरेला गव्याचे शिंग लागून गंभीर जखम झाली. यावेळी जवळच उभ्या असलेल्या प्रकाश यांच्या पत्नीने जोरदार आरडाओरडा केला. या आवाजाने गव्याने जंगलात धूम ठोकली.
गवा पळून गेल्यानंतर प्रकाश यांच्या पत्नीने गाव गाठून गावातील लोकांना ही घटना सांगितली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत पडलेल्या प्रकाश गुरव यांना गाठले. ही घटना गावापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर घडली होती. जखमी प्रकाश यांना घटना स्थळावरून इस्पितळापर्यंत नेण्याची कोणतीच वाहन व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांनी नजीकच्या झाडाझुडुपांतून काट्या तोडून तिरडीसारखे साधन बनवून त्यातून जखमी प्रकाश यांना गावात आणले. नंतर त्याला एका टेम्पोने खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव रुग्णालयात हलवण्यात आले.


[video width="480" height="864" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/10/VID-20251015-WA0008-1.mp4"][/video]

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती