बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी भागात मुसळधार पावसामुळे गाजर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी दौरा केला.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली.
"पिकांच्या नुकसानीमुळे आम्ही मोठ्या अडचणीत आहोत, मात्र आमची व्यथा ऐकण्यासाठी मंत्री किंवा स्थानिक आमदार आलेले नाहीत. तसेच अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे पंचनामा केलेला नाही" अशी तक्रार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
या पाहणी दौऱ्यात विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानपरिषदेचे सदस्य एन. रवीकुमार, सी. टी. रवी, खासदार रमेश जिगजिनगी, राज्यसभेचे सदस्य ईरन्ना कडाडी, आमदार रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, विठ्ठल हलगेकर, माजी आमदार संजय पाटील, महंतेश दोडगौडर, तसेच विधानपरिषदेचे माजी सदस्य महंतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.
[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/10/VID-20251003-WA0006.mp4"][/video]