बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्य इरण्णा कडाडी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 4 ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजनासाठी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी, बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी इरण्णा कडाडी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
"भौगोलिकदृष्ट्या बेळगाव हा अत्यंत मोठा जिल्हा आहे. त्यामुळे बर्याच दिवसांपासून जिल्हा विभाजनाची मागणी होत आहे. मुख्यमंत्री बेळगावात आल्यावर त्यांनी नवीन जिल्ह्याची घोषणा करावी," अशी आमची ठाम भूमिका असल्याचे इरण्णा कडाडी यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना म्हटले आहे.
[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/10/VID-20251003-WA0006.mp4"][/video]