LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

स्त्रियांचे सामर्थ्य आणि सृजनशीलता आमच्या विद्यार्थिनींनी सिद्ध केली : डॉ. मनीषा नेसरकर

बेळगाव : स्त्रियांचे सामर्थ्य आणि सृजनशीलता आमच्या विद्यार्थिनींनी सिद्ध केली असे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मनीषा नेसरकर म्हणाल्या.


येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा नेसरकर या उपस्थित होत्या. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, उपाध्यक्ष प्रा विनोद गायकवाड, डॉ. मनीषा नेसरकर आणि सहकार्यवाह अनंत जांगळे उपस्थित होते.



यावेळी मराठी विभागातील पीएचडी पूर्ण केलेल्या आणि करीत असलेल्या विद्यार्थिनींनी आपले अनुभव कथन केले. पीएचडी पदवी पर्यंतचा प्रवास खडतर असतो. पण सर्व संकटाना तोंड देत त्यांच्या यशाची शिखर गाठणाऱ्या विद्यार्थीनी इतरांना आदर्शवत अशा आहेत आणि त्यांना इथे आणून व्यक्त करण्याचा सार्वजनिक वाचनालयाचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे, असे डॉक्टर मनीषा नेसरकर यावेळी बोलताना म्हणाल्या.



याप्रसंगी प्रियांका भांदुर्गे (कट्टणभावी), सुवर्णा पाटील (किणये), पूजा कांबळे (कारदगा) नेहा पाटील (चोर्ला), सोनाली कांगले (वडगाव), सुप्रिया जाधव (संकेश्वर), कल्पना रायजाधव (कारदगा), मनीषा पाटील (कलखांब), डॉ वृषाली कदम (मन्नूर), पूजा डेळेकर (मच्छे), नर्मदा कुराडे (चिकोडी), डॉ शोभा पाटील (निपाणी) आदींनी आपले पीएचडी बाबतचे अनुभव कथन केले. या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार पुष्प गुच्छ आणि वाचनालयाचे स्मृतिचिन्ह देऊन अध्यक्ष व संचालकांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करून श्री अनंत लाड यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. आभार प्रदर्शन संचालक रघुनाथ बांडगी यांनी तर सूत्रसंचालन प्रा विनोद गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला एम ए आणि पीएचडीच्या विद्यार्थीनी, त्यांचे नातेवाईक, वाचनालयाचे संचालक, कर्मचारी आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती