LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

एसबीएमजे प्राचार्या निशा राजेंद्र यांना पदावर कायम ठेवण्याची पालकांची मागणी

बेळगाव : भुतरामनहट्टी येथील श्री भगवान महावीर जैन इंग्लिश मीडियम रेसिडेन्शियल स्कुल या निवासी शाळेच्या प्राचार्यांना सेवेत कायम ठेवण्याची मागणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.



शाळेच्या प्राचार्या निशा राजेंद्र यांना पदावरून न हटविता त्यांना सेवेत कायम ठेवावे, अशा मागणीचे निवेदन पालकांनी जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांना दिले आहे.

अलीकडे काही विद्यार्थ्यांशी संबंधित घडलेल्या एका स्वतंत्र घटनेनंतर प्राचार्यांना बदलण्याची शक्यता असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या 200 हून अधिक पालकांनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनाद्वारे प्राचार्या निशा राजेंद्र यांना सेवेतून न हटविण्याची मागणी केली आहे.
त्या अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि कठोर प्रशासक असून त्यांची कार्यपद्धती नेहमी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक आणि सर्वांगीण विकासासाठी पूरक आहे. निशा राजेंद्र यांनी शाळेत शिस्त, स्थैर्य आणि सातत्यपूर्ण प्रगती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. “अनेक पालकांसाठी त्या संस्थेचा चेहरा असून मुलांच्या भविष्याबाबत विश्वास देणाऱ्या व्यक्ती आहेत,” त्यांना पदावरून हटविल्यास शाळेच्या शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि सुमारे 800 विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालात घसरण होण्यासोबतच पालक आणि शिक्षकांचा विश्वासही डळमळीत होऊ शकतो, असेही पालकांनी निवेदनात म्हटले आहे.
त्यांच्याबाबत“कठोर निर्णय घेण्याऐवजी संबंधित विद्यार्थी आणि पालकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा,” असा सल्लाही पालकांनी दिला.
दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर ते शाळा व्यवस्थापनाकडे पाठवण्याचे आश्वासन पालकांना दिले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती