LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 13 वा दिक्षांत समारंभ 11 एप्रिल रोजी

बेळगाव ( bn7 news) : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 13 वा दिक्षांत समारंभ 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी.एम. त्यागराज यांनी ही माहिती दिली आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल थावरचंद गेहलोत राहणार असून, उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पद्मश्री सन्मानित प्रा. गणेश नारायणदास देवी यांचे प्रमुख दिक्षांत भाषण होणार आहे.


या दिक्षांत समारंभात एकूण 46013 पदवीधर, 2866 पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित केली जातील. यामध्ये 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, तर काहींना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय 20 पीएच.डी. पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कृषी, शिक्षण व सामाजिक समरसतेतील कार्यासाठी निडसोजी मठाचे जगद्गुरू शिवलिंगेश्वर स्वामी यांना डॉक्टर ऑफ लेटर्स, कायदा, न्याय व राज्यघटनेच्या जागृतीसाठी माजी मुख्य न्यायाधीश एच.एन. नागमोहनदास यांना डॉक्टर ऑफ लॉ, तसेच शिक्षण, सहकार व सामाजिक सेवेत योगदानासाठी विजापूर येथील सीक्याबचे अध्यक्ष शमसुद्दीन अब्दुल्ला पुणेकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही सन्माननीय पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू प्रा. सी.एम. त्यागराज यांनी सांगितले आहे.


सन 2023 चा दिक्षांत समारंभ 2024 मध्ये पार पडला होता. सन 2024 चा समारंभ आता होत असून, या शैक्षणिक वर्षाचा म्हणजेच 2025 चा समारंभ यावर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. यामुळे शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या फायदा होईल, असे कुलगुरु सी.एम. त्यागराज यांनी स्पष्ट केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती