LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बालवीर विद्यानिकेतनमध्ये झाला शिक्षक पालक व संचालक मेळावा 

बेळगुंदी ( bn7 news) : येथील बालवीर विद्यानिकेतनच्यावतीने शिक्षक-पालक व संचालक मेळावा घेण्यात आला. संचालक-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये प्रगती साधावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याची सुरुवात शाळेच्या शिक्षिकांच्या स्फूर्तीगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालवीर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव हे होते. प्राध्यापक डी डी बेळगावकर म्हणाले की मुलांना मोबाईलची लागलेली सवय, पालकांनी मुलासोबत संवाद वाढविणे, खेळ आणि अभ्यास याकडे लक्ष दिले पाहीजे असे प्रास्ताविकपर भाषणातून सांगितले. प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर यांनी शाळेचा संपूर्ण आढावा सादर केला . पालक प्रतिनिधी परशराम नाकाडी यांनी मनोगत व्यक्त केले. मुलांच्या योग्य जडणघडणीसाठी शिक्षकांच्या प्रत्येक प्रयत्नाला पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. मुलांना शिस्तीचे महत्त्व शिकवताना, पालकांनी स्वतः शिस्त पाळली पाहिजे. मुलांचे शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे, कारण यामुळे त्यांचा बौद्धिक विकास अधिक प्रभावी होतो. तसेच, मुलांना लवकर उठण्याची सवय लागली पाहिजे, जेणेकरून त्यांचा दिवस सुरळीतपणे सुरू होईल असे प्राध्यापक माय्याप्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले. मुलांना घडवताना पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते असे आय आर एस आयकर आयुक्त आकाश चौगुले यांनी सांगितले संस्थेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. पालकांमधून अनेकांनी शाळेच्या प्रगती व विकासासाठी भर देण्याची हितगूज केले.
या मेळाव्यासाठी शंकर चौगुले, परशराम हदगल, यल्लाप्पा ढेकोळकर ,राजू मुजावर, आप्पा जाधव, रिता बेळगावकर, आनंदा जाधव, पुंडलिक सुतार, नागोजी नाकाडी, धाकलू पाटील भरमू पाटील, परशराम झंगरूचे, दशरथ पाऊसकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनी केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती