LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मेंढपाळ बिरदेव डोणे आला ....! त्याने आपलं ध्येय पक्कं केलं ...!! परिश्रम घेतले आणि तो जिंकला .....!!

निश्चित ध्येय आणि त्या ध्येयपूर्तीसाठी योग्य दिशेने अथक परिश्रम घेतले की यश मिळतेच, असे यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या धनगरी समाजातील तरुणाने म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी परिक्षेमध्ये मोठं यश मिळवलं आहे. मेंढ्या चारण्यास गेलेल्या या युवकाचा पालावरच सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्याने उपरोक्त मत मांडलं.



प्रत्येकासमोर आव्हान येतातच पण या आव्हानांना सक्षमपणे सामोरं जाणं गरजेचं आहे जीवनात समस्यांचं रडगाणं न गाता सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश संपादन करता येतं, असेही या युवकाने सत्काराला उत्तर देताना म्हटले आहे.


बिरदेव डोणे असे यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या धनगरी समाजातील युवकाचे नाव असून त्याचा UPSC चा निकाल लागला, तेव्हा तो मेंढरं घेऊन कर्नाटकातील बेळगावला आला होता.


संपूर्ण परिस्थितीच बिकट, अभ्यासासाठी जागाही नाही किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेत कोल्हापुरातल्या या मेंढपाळाच्या मुलाने यश मिळवलंय. बिरदेव सिद्धापा डोणे असं त्याचं नाव आहे. यूपीएससीमध्ये त्याने देशात 551 वा क्रमांक मिळवला आहे.


बिरदेव डोणेचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील अमगे. आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा बिरदेव डोणेचा परिवार आहे.
बिरदेवचे प्राथमिक शिक्षण अमगे गावातील विद्यामंदीर शाळेत झाले. त्याच ठिकाणच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीमध्ये 96 टक्के गुण घेऊन बिरदेव हा मुरगूड केंद्रात पहिला आला. त्यानंतर मुरगूडच्या शिवराज विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्याने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. बारावीमध्येही 89 टक्के गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर पुण्यातील सीओईपीमधून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली.


शाळेत असल्यापासूनच आयपीएस व्हायची त्याची इच्छा होती. त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्याने अभ्यास केला. दिल्ली-पुण्यात जाऊन यूपीएससीचा अभ्यास करणे म्हणजे खर्चाचे. त्यासाठी महिनाकाठी किमान दहा ते बारा हजार रुपयांचा खर्च. तो खर्च परवडणार नाही, त्यामुळे तू कुठेतरी नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी दिला. परंतु आयपीएस व्हायचंच या एका इच्छेने बिरदेवने परिस्थितीवर मात केली.
बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा भारतीय सैन्यात सेवेत आहे. त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला. बिरदेवने दोन वर्षे दिल्लीत अभ्यास केला. त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली. दोन वेळा अपयश आल्यानंतरही खचला नाही. तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात 551 व्या क्रमांकाने यश मिळवलं. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे यश मिळवलं आहे.
बिरदेव डोणेला भारतीय पोलिस सेवा म्हणजे आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.


यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला तेव्हा बिरदेव गावात नव्हता. बिरदेव त्याच्या आई-वडिलांसह बेळगावमधील अथणी येथे मेंढ्यासंह गेला होता. निकालाची माहिती मिळताच पालावरच धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला.
जिद्द आणि मेहनत असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. केवळ आव्हानांना धाडसाने सामोरे जा, प्रामाणिक प्रयत्न केल्यास जीवनात यश मिळतेच, असे बिरदेव डोणे याने सत्कारावेळी बोलताना म्हटले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती