LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

संचिता संतोष गावडे ' होम मिनिस्टर ' पैठणीची विजेती

चंदगड : शिवाळे (ता. चंदगड) येथील ॐकार नवचैतन्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित ' होम मिनिस्टर ' स्पर्धेत संचिता संतोष गावडे ह्या होम मिनिस्टर ' पैठणीच्या विजेत्या ठरल्या.


नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानार्थ ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत संगिता भैरू पाटील उपविजेत्या ठरल्या.


विजेत्या संचिता संतोष गावडे यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. हे बक्षीस लक्ष्मी भागोजी वांद्रे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच उपविजेती सौ. संगिता भैरू पाटील यांना कांजिवरम साडीचे बक्षीस देण्यात आले,. हे बक्षीस लता रामचंद्र पाटील आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी भागोजी वांद्रे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन लता रामचंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. व्यासपीठावर पोलिस पाटील सौ. शुभांगी शांताराम पाटील, वैदही वैजू गावडे, वैशाली नारायण पाटील, नंदिनी परशराम फडके आणि अश्विनी अशोक गावडे उपस्थित होत्या.


स्पर्धेदरम्यान महिलांसाठी तळ्यात-मळ्यात, लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, प्लास्टिक ग्लास मनोरा रचना, स्टॉ खोप्यात घालणे, फुगे फोडणे, केळी खाणे, पाणी पिणे आणि पिठातील चेंडू तोंडाने काढणे असे विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये महिलांनी उत्साहात सहभाग घेतला. या खेळांचे सूत्रसंचालन संजय साबळे आणि रवी पाटील यांनी केले.
प्रत्येक खेळातील विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली, तसेच सहभागी सर्व महिलांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.


या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील, सचिव महादेव पाटील, युवराज वांद्रे, जोतिबा वांद्रे, डेप्युटी सरपंच संतोष गावडे, ग्राम पंचायत सदस्य परशराम फडके, अनंत गावडे, संदिप गावडे आणि संजय गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती