LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

प्रेक्षकांचा ताण कमी करण्यासाठी 27 जूनला प्रदर्शित होतोय निखळ करमणूक प्रधान मराठी चित्रपट 'ऑल इज वेल' : दिग्दर्शक योगेश जाधव यांनी दिलीय माहिती

बेळगाव- प्रेक्षकांची निखळ आनंद देणारा करमणूक प्रधान असा ' ऑल इज वेल ' हा मराठी चित्रपट 27 जूनला प्रदर्शित होत आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.


'ऑल इज वेल' हा वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सचा हा पहिलाच चित्रपट आहे. या मनोरंजन आणि मस्तीने भरलेल्या मराठी चित्रपटात अमर, अकबर आणि अँथनी नावाच्या तीन मित्रांच्या मैत्रीची धमाल गोष्ट पहायला मिळणार आहे.
मैत्रीसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या तीन मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की त्यांच्या आयुष्यात खळबळ उडते.
प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर या या अभिनेत्यांनी 'ऑल इज वेल' चित्रपटात खूपच दमदार भूमिका वटविल्या आहेत. केवळ निखळ मनोरंजनाच्या हेतूने ऑल इज वेल चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहितीही चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश जाधव यांनी बेळगावात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
'ऑल इज वेल' चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत.
प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर यांचा अभिनय बहारदार आहे. या तिघांसोबत या चित्रपटात अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची या चित्रपटातील भूमिका जबरदस्त आणि दाद मिळवून जाणारी आहे, असे सांगताना चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास योगेश जाधव यांनी व्यक्त केला.
चित्रपटाला चित्रपट महामंडळानचे चांगले सहकार्य मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.


चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हलप्पणावर यांनी, हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहण्याजोगा आणि निखळ आनंद देणारा आहे, असे सांगितले.


चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. पटकथा, संवाद प्रियदर्शन जाधव यांनी लिहिले आहेत. युवा पिढीला भुरळ घालणारे, संगीतकार चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे. चित्रपट छायाचित्रकारणात विश्वविक्रम करणारे मयुरेश जोशी यांनी चित्रपटाचे छायांकन केले आहे तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी 'ऑल इज वेल' चित्रपटातील गाणी गायली आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.


27 जूनला बेळगाव सह महाराष्ट्रात 'ऑल इज वेल' चित्रपट प्रदर्शित केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.



या पत्रकार परिषदेला मल्लेश मरुचे, दीपक सांबरेकर, विनायक पट्टनशेट्टी, अमित जाधव यासह बेळगावचे प्रा.आनंद आपटेकर, प्रकाश कालकुंद्रीकर, मदन बामणे, विकास कलघटगी उपस्थित होते.


[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती