LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बालवीर विद्यानिकेतनमध्ये नूतन वर्षारंभ : विद्यार्थ्यांचे शानदार स्वागत

बेळगाव : बालवीर विद्यानिकेतनमध्ये 2025-26 या नूतन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शानदार स्वागत करण्यात आले. लेझीम व ढोलच्या तालावर वाजतगाजत फुलांची उधळण करत शाळेच्या प्रवेशद्वारापासून व्यासपीठापर्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर बालवीर विद्यानिकेतनचे संयोजक शंकर चौगुले, सचिव पी.के. हदगल, मार्गदर्शक व संचालक डी.डी.बेळगावकर, राजू मुजावर, दशरथ पाऊसकर, पुंडलिक सुतार, एस.एन.जाधव, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापुरकर, पालक प्रतिनिधी भावकू तारीहाळकर, अरूण सुतार, अमोल हलकर्णीकर, राहुल भास्कर, भरमाणी सुतार, शरद चौगुले, शंकर नाईक, मनीषा चोपडे, कविता गवंडी आदी मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.
साक्षरतेचा संदेश देणाऱ्या अक्षर व शब्द फलकांचे कुंडीत रोपण करून सन 2025 26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. यानंतर डी.डी. बेळगावकर, शंकर चौगुले यांनी उपस्थित पालक वर्गाला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व नूतन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी व शाळेच्या ताईनी अतिशय सुंदर अशी नृत्ये सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शहापूरकर यांनी केले तर गोविंद गावडे यांनी आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती