LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सरकारी प्राथमिक मराठी शाळा कसबा नंदगडच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

खानापूर : कसबा नंदगड येथील सरकारी प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेतील 2005-06 सालच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने तब्बल 20 वर्षानंतर शाळेचे 2005-06 सालाचे माजी विद्यार्थी एकत्र आले आणि जुन्या स्मृतींना आपसूकच उजाळा मिळाला.


कसबा नंदगड येथे आयोजित ह्या स्नेहमेळाव्यात तब्बल 15 हून अधिक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रारंभी शिक्षक टी. व्ही पाटील, टी. आर गुरव, ए. बी. पुजेर, आर बी.बेटगेरी, पी. एम.शिंदे, ए एम शिंदे, एल आय देसाई, एम एन कांबळे शिक्षिका सौ.भारती पाटील, सौ.के एन कंग्राळकर, सौ.संगिता पाटील, सौ. व्ही. एस. कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह सरस्वती पूजन करण्यात आले.
त्यानंतर शाळेच्या मुलींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. स्वागत टी. आर गुरव तर प्रास्ताविक मुख्याध्यापक ए. एम. शिंदे यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमीटीचे अध्यक्ष चंद्रकांत करडी होते.
त्यानंतर माजी विद्यार्थ्यांतर्फे सर्व गुरुजनांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त टि आर गुरव व आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त सौ.भारती पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तसेच भारतीय सैन्यात सेवा बजावत असणाऱ्या 2005-06 बॅच मधील माजी विद्यार्थी यल्लोजी नागोजी पाटील यांना गौरवण्यात आले.
शाळेला भेटवस्तू रूपात संगणक प्रदान करण्यात आला. तसेच पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पुठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डी .एम बागवान सी.आर.पी नंदगड विभाग, शाळा सुधारणा कमीटीचे सर्व सभासद, ग्राम पंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणींना उजाळा मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी माजी विद्यार्थी महेंद्र पाटील,भूषण पाटील यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
स्नेहमेळावा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कसबा नंदगड व भुत्तेवाडी गावातील माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे मोठे योगदान लाभले. शिक्षक.एल आय देसाई यांच्या सुंदर सुत्रसंचलनाने स्नेहमेळाव्यात विशेष रंग आला होता. शिक्षक टी. आर.गुरव यांनी आभार मानले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती