LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ठळकवाडी हायस्कूलचे विद्यार्थी भेटले तब्बल पन्नास वर्षांनी ...!

बेळगाव : साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूलचे सन 1974 -75 बॅचचे विद्यार्थी तब्बल पन्नास वर्षांनी एक-दुसऱ्यांना भेटले आणि शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.



ठळकवाडी हायस्कूलच्या 1974 -75 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी पुनर्मिलन सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला. या कार्यक्रमात हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. आर आर कुडतुरकर आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.



या अविस्मरणीय पुनर्मिलन सोहळ्याची सुरुवात कुडतुरकर, दीपक परुळेकर, एस के इ सोसायटीचे नितीन करमली, जयंत दीक्षित, महादेव चौगुले व अशोक देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.
उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने आपला परिचय करून देऊन शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि या पुनर्मिलनाबद्दल आनंद व्यक्त केला. जुने मित्र आणि सहकारी पन्नास वर्षानंतर भेटल्याने वातावरण अतिशय आनंददायी बनले होते. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला भेटवस्तू देण्यात आली. या भेटवस्तूचे प्रयोजकत्व नितीन करमली व दीपक परुळेकर यांनी केले होते. याप्रसंगी आशुतोष मनोहर व इतरानी आपल्या शाळेबाबत, शिक्षकांनी केलेल्या संस्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप पवार ,महादेव चौगुले, नितीन करमली, विवेक देसाई व सुरेंद्र मेहंदरगे वगैरेंनी परिश्रम घेतले. उपस्थित 45 हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये मुंबई, पुणे, बेंगलोर, गोवा व ऑस्ट्रेलियाहून खास आलेला दीपक परुळेकर आदी माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप पवार यांनी केले तर रामकृष्ण दाते यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत झाले. यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती