बेंगळूर :
बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (व्हीटीयू) कुलगुरूपदी एस. विद्याशंकर यांची झालेली नियुक्ती वादात सापडली असून, या नियुक्तीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि विद्यापीठाला तातडीने नोटीस बजावण्याचे आदेश दिले असल्याचे कळते.
हासन येथील प्राध्यापक बी. योगेश आणि के.ए. वेणूगोपाल यांनी या नियुक्तीला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एच. टी. नरेंद्र प्रसाद यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने सुनावणी करत सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून, पुढील सुनावणीला मुदत दिली असल्याचे समजते.
"व्हीटीयूच्या अकॅडमिक सिनेट आणि बाह्य मंडळाच्या सदस्यांचाच समावेश असलेल्या शोध समितीच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही प्रक्रिया यूजीसीच्या 2018 च्या मार्गदर्शक सूचनांशी तसेच विद्यापीठ कायद्याशी विसंगत आहे. त्यामुळे ही नियुक्ती रद्द करण्यात यावी," अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.
[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]