LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

येळळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

येळळूर : : येळळूर ( तालुका-बेळगाव) येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत.


संमेलन पाच सत्रात होणार आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे. तर दुसऱ्या सूत्रात पुण्याचे साहित्यिक दत्ता देसाई हे "आपली संस्कृती, आपला विकास " यावर आपले विचार मांडणार आहेत. तर तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कार वितरण. याचबरोबर "एक तास बसा... मनसोक्त हसा" विनोदी कार्यक्रम लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे हे सादर करणार आहेत. तर चौथ्या सत्रात 'जागर लोककलेचा ' हा जुगलबंदी भारुड, विनोदी कार्यक्रम संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करणार आहेत. तर पाचव्या सत्रात मुंबई येथील प्रसिद्ध अभिनेत्याचे मनोगत ऐकायला मिळणार आहे.


डॉ. शरद बाविस्कर हे धुळे जिल्ह्यातील रावेर येथील कोरडवाहू शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि संघर्षातून यश संपादन करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. दहावीत इंग्रजी विषयात नापास झाल्यानंतरही सात भाषांवर प्रभुत्व मिळवून त्यांनी पाच मास्टर्स डिग्र्या प्राप्त केल्या आणि फ्रेंच तत्त्वज्ञानात पीएचडी पूर्ण केली. सध्या ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), दिल्ली येथे फ्रेंच आणि फ्रँकोफोन स्टडीजचे प्राध्यापक आहेत.
त्यांचे आत्मकथन ‘भुरा’ मराठी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे. भाषाशास्त्र, सामाजिक भाषाशास्त्र, फ्रेंच साहित्य, संस्कृती अध्ययन आणि तत्त्वज्ञान हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करत युरोपमधील तीन देशांत उच्च शिक्षण घेतले. त्यांच्या प्रवासाने शैक्षणिक यशासाठी प्रखर जिद्दीचे उदाहरण निर्माण केले आहे. संमेलनाची तयारी जोमात सुरू आहे. संमेलनला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, कार्याध्यक्ष प्रा. सी.एम. गोरल, सचिव डॉ. तानाजी पावले यांनी केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती