LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मृणालिनी इंग्लिश अकादमी ( एमईए) संस्थेचा 28 वा वर्धापनदिन उत्साहात

बेळगाव : भारत नगर- वडगाव रोड येथील मृणालिनी इंग्लिश अकादमी (MEA) या संस्थेचा 28 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सन 1998 मध्ये केवळ एका विद्यार्थ्यापासून सुरू झालेल्या या संस्थेने आज हजारों विद्यार्थ्यांना इंग्रजीत पारंगत केले असल्याची आठवण मान्यवरांनी वर्धापनदिन कार्यक्रमात करून दिली.


या कार्यक्रमात पाहुण्यांनी अकादमीच्या नवीन 'स्मार्ट बोर्ड'चे उद्घाटन केले. अ‍ॅटलासियनचे अभियंते सुनील कवटेकर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी उच्च कामगिरी करण्यासाठी आणि जीवनात सुयश मिळविण्यासाठी सातत्याने अभ्यास करण्याचे आवाहन केले.


संस्थेच्या सह-संचालक आणि प्रशिक्षक कोमल कोळीमठ, अकादमीचे वरिष्ठ विद्यार्थी श्रीनिवास साके आणि योगेश आजरेकर याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वीणा पाटील यांनी केले.


विद्यार्थ्यांना संबोधित करताना, संस्थेचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षक राजशेखर कोळीमठ यांनी, "आज आमच्या अकादमीचे विद्यार्थी जगभरात विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगून वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने इंग्रजी भाषेत प्राविण्य मिळविणे ही आजची गरज आहे.", असे म्हटले.


शैक्षणिक वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी म्हणून साक्षी टाकळे हिला चषक आणि 2 हजार रुपये रोख बक्षीस, वार्षिक इंग्रजी प्रविण चाचणीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या वीणा पाटील यांना 1 हजार रुपये रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कला आणि हस्तकला, ​​निबंध लेखन, स्पेलिंग बी, चित्रकला आणि कथाकथन स्पर्धांमधील विजेत्यांनाही बक्षिसे वितरित करण्यात आली.


वसुधा सालगुडे आणि कीर्ती शेट यांच्या स्वागतगीताने सुरू झालेल्या या समारंभात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य आणि गायन सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. वसुधा सालगुडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती