LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हळद उत्पन्नात घट : दरातही घसरण : शेतकरी चिंतेत

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात यावर्षी हळद उत्पन्नात घट झाली असून दरातही घसरण झाली आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी निराश आणि चिंताग्रस्त आहे.


जिल्ह्यात सुमारे 3900 हेक्टरवर हळद लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हळदीचा दर निम्म्यापेक्षा जास्त घसरलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.


हंगामात पोषक पाऊस न झाल्याने हळद पीक वाळून गेले. यामुळे हळद उत्पन्नात घट झाल्याचे सांगण्यात येते.


कल्लोळी येथील शेतकरी बाळप्पा बेळकूड यांनी हळद उत्पन्नात घट का झाली हे सांगताना, “मागील वर्षी मे महिन्यात 6 एकर शेतात हळद लागवड केली होती. मात्र जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस झाला नाही. पीक वाळून गेल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी हळद उत्पन्नात घट झाल्याचे म्हटले आहे.


बेळगाव जिल्ह्यातील हळद प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. गेल्या वर्षी क्विंटलला 30 हजार रुपये दर मिळाला होता. पण यावर्षी तो 12 ते 13 हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. काही प्रमाणात तर हळद 11 हजार रुपये क्विंटल भावाने हळद विकावी लागल्याचे बाळप्पा बेळकूड यांनी सांगितले आहे.


मुडलगी तालुक्यातील नागनूर येथील शेतकरी महावीर मेळवंकी यांनी, “यावर्षी 7 एकरमध्ये हळद लावली आहे. गेल्या वर्षी एका एकराला 40 क्विंटल उत्पादन मिळाले होते. पण यावर्षी ते 30 क्विंटलवर आले आहे. शिवाय दरही कमी झाला आहे.” असे सांगितले आहे.


एका एकरात हळद लागवडीसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च येतो. क्विंटलला 10 हजार रुपयांपेक्षा कमी दर मिळाल्यास नफा मिळणे कठीण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी मार्केट इंटर्वेन्शन स्कीमअंतर्गत सरकारने हळद खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


“जिल्ह्यात दरवर्षी हळद लागवड करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऊस घेतल्यानंतर त्या जमिनीवर शेतकरी हळद लागवडीसाठी पुढे येत आहेत,” अशी माहिती उद्यान विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोड यांनी दिली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती