LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

लग्न ठरत नसल्याच्या मानसिक तणावातून युवकाची आत्महत्या : केले विषप्राशन :;पिरनवाडीतील हृदयद्रावक घटना

बेळगाव ( bn7 news) : लग्न ठरत नसल्याच्या मानसिक तणावातून विष प्राशन केलेल्या त्या युवकाचा अखेर मृत्यू झाला. 30 मार्चला त्याने विषप्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपयोग झाला नाही. पाच दिवसांनी त्याची प्राणज्योत मालवली.


लग्न ठरत नसल्याने निराश होऊन पिरणवाडी येथील 32 वर्षीय युवकाने 30 मार्चला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्याचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.


मृत युवकाचे नाव बसवराज वीराप्पा जुलपी असे असून तो मूळचा हिरेनंदिहळ्ळी (ता. कितूर) येथील रहिवाशी आहे. सध्या तो मारुतीनगर, पिरनवाडी येथे वास्तव्यास होता.


30 मार्च रोजी दुपारी त्याने विष प्राशन केले होते. त्यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्याचा मृत्यू झाला.


या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाली असून, अधिक तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती