LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

संघटन बांधणीसाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने फुंकले रणशिंग

येळ्ळूर : संघटन बांधणीसाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने रणशिंग फुंकले.



तळागळातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून समितीला बळकटी देण्याबरोबर दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी परमेश्वर मंदिर येथे विभागवार बैठका घेण्यात येणार आहेत. याचा श्रीगणेशा करण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबू यल्लापा कंग्राळकर होते.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविक भाषणात सीमा चळवळीचा आढावा घेत मराठी जनतेने संघटीत राहून लढा तीव्र केला पाहिजे. 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही संघटित राहिले पाहिजेत, असे सांगून सर्वांचे स्वागत केले.
बैठकीला मार्गदर्शन करताना निवृत्त मुख्याध्यापक पुंडलीक कंग्राळकर यांनी, मराठी जनतेने एका विचाराने आणि ध्येयाने भगव्या झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे तरच मराठी माणसांची ताकद वाढणार असल्याचे सांगितले.
ग्राम पंचायतीचे माजी उपाध्यक्ष दुद्दापा बागेवाडी यांनी, आपलं काम प्रामाणिकपणे करत, सीमा लढ्याला आणि विस्कटलेल्या गाव घडीला सुरळीत करण्यासाठी संघटीत पणे प्रयत्न केले गेले पाहिजेत, असे म्हटले.
माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य राजू पावले यांनी येणाऱ्या सर्व जबाबदारी समितीच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहून समितीचा भगवा झेंडा डौलाने फडकत ठेवण्यासाठी कार्यरत राहू असे म्हटले.
श्रीकांत नांदूरकर यांनी, सीमा लढा आणि ग्रामपंचायतीच्या दैनंदिन समस्या वर आपले परखड विचार मांडले. अनेक कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दता उघाडे यांनी समर्पक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.
बैठकीचे अध्यक्ष बाबू यल्लापा कंग्राळकर यांनी, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागातून सीमा लढ्याला बळकटी प्राप्त होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने त्यागाची भूमिका ठेवावी, असे सांगत अशा या बैठका घेण्याच्या भूमिकेचे मनापासून स्वागत केले.
यावेळी सुरज गोरल, सतीश देसुरकर, शिवाजी सायनेकर , प्रकाश पाटील, प्रकाश मालुचे आदी कार्यकर्त्यांनी संघटना बळकटी संदर्भात विचार व्यक्त केले.
या बैठकीस कृष्णा शहापूरकर, बाळकृष्ण पाटील, कृष्णा बिजगरकर, भिमराव पुण्याण्णावर, रामचंद्र कुगजी, रमेश धामणेकर, परशराम बिजगरकर, प्रभाकर कंग्राळकर, संजय हुंदरे, रामा पाखरे, परशराम पाटील, भावकाना कुगजी, पंकज धामणेकर, सुरज पाटील आदि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. नागेश बोभाटे यांनी आभार मानले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती