LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बागलकोट जिल्हा रुग्णालयाच्या बाथरूममध्ये विधवेवर अत्याचार ...?

बागलकोट : जिल्हा रुग्णालयातील डी-श्रेणीतील बाह्य कंत्राटी कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये एका विधवा महिलेवर बाथरूममध्ये अत्याचार केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. फरीदसाब डांगी असे विधवेवर अत्याचार केलेल्या आरोपीचे नाव आहे.


34 वर्षीय पीडित महिला उपचार घेत असलेल्या आपल्या रुग्ण भावाच्या उपचारासाठी रुग्णालयात राहिली होती.
आपल्या आजारी भावाची सेवा करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात राहिलेल्या त्या महिलेसोबत आरोपी फरीदसाब डांगी याची ओळख झाली होती. या ओळखीमुळे दोघांत अधूनमधून बोलणे व्हायचे.
4 मे रोजी मध्यरात्री 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान आरोपीने त्या महिलेला धमकावून डी-श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाथरूममध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. कृत्यानंतर आरोपीने महिलेला आतमध्येच बंद करून ठेवले आणि तो निघून गेला.
घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी
बागलकोट महिला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवि कलम 127(2), 352, 351(2), 64, 64(2)(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पिडीत महिलेच्या भावाने पोलिसांकडे केली आहे.
या प्रकार गांभीर्याने घेऊन जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक महेश कोणी यांनी आरोपी फरीदसाब याला तत्काळ नोकरीतून काढून टाकले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती