LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भाजपच्या काळातील दरवाढीबद्दल का नाही आंदोलन ? : डी.के. शिवकुमार यांचा भाजपला खोचक सवाल

बेंगळूर : भाजप कार्यकाळात1 पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर यांसारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या. आता टोल दर वाढवले गेले. याबद्दल भाजप मूग गिळून गप्प का ? या दरवाढीबद्दल का झाले नाही आंदोलन ?
असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राज्य भाजपला केला आहे.


भाजपच्या दरवाढीविरोधातील आंदोलनावर टीका केली. "आम्ही दुधाच्या दरात वाढ केली आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही काम करत आहोत. केवळ खांद्यावर हिरवा टॉवेल घेतल्याने शेतकऱ्यांचा कैवारी होत नाही. आम्ही गावांमध्ये गेलो असता, शेतकऱ्यांनी आम्हाला कधीच विरोध केला नाही, हेच आमचे पुण्य आहे, असे दिल्लीला गेलेल्या डी. के. शिवकुमार यांनी तेथील पत्रकारांशी बोलताना म्हटले.


भाजप कार्यकालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या, तेव्हा भाजपने आंदोलन का केले नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


भाजप व जेडीएस यांच्या आंदोलनाबद्दल विचारले असता, "त्यां दोन्ही पक्षाचा मुद्दा मला नको. एका नाण्याच्या दोन बाजूंसारखे हे पक्ष आहेत. मग या चर्चेची गरज काय? असे सांगत भाजपच्या आंदोलनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना आपला पक्ष वाचवायचा आहे, त्यांनी राजकारण करावे," असे डी के. शिवकुमार यांनी सांगितले.


गारंटी योजनांमुळे खर्च वाढल्याने सरकार दरवाढ करत असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केले की, "इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात दुधाचा दर कमी आहे."


मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता, "राहुल गांधी हे पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत, म्हणून ही भेट झाली. मीही भेट घेतली आहे. अनेक नेत्यांना भेटत असतो. काँग्रेस कार्यालय म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचे मंदिर आहे. भेट घेतल्यास त्यात चुकीचे काही नाही," असे त्यांनी सांगितले.


दिल्लीतील नव्या कर्नाटका भवनबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, "हे भवन आपल्या राज्याच्या नागरिकांसाठी एक दूत म्हणून कार्य करेल. यात सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांना सोयी मिळतील. येथे होणाऱ्या चर्चांमुळे राज्याला फायदा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही सूचना दिल्या आहेत, त्या आम्ही अंमलात आणू. यावर मुख्यमंत्र्यांचीही सहमती आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती