LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान 

बेळगाव : ऋतू येतात आणि जातात आणि काळाचा प्रवास सुरू राहतो. परंतु काही व्यक्ति अशा असतात ज्या काळाच्या प्रवाहासोबत वाहून जात नाहीत तर आपल्या जिद्दीने आपल्या कष्टाने आपल्या प्रामाणिकपणाने आणि आपल्या कर्तुत्वाने काळाच्या मनावर एक सुंदर अशी छाप उमटवून जातात. आणि आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाच्या जीवनप्रवासाचा सन्मान व जीवन प्रवासाला मानवंदना देत आहोत, असे बेळगाव तालुका शिक्षक सोसायटीचे माजीं अध्यक्ष व विद्यमान संचालक तसेच मराठा शिक्षक संघाचे गौरवाध्यक्ष शेखर करंबळकर म्हणाले.
सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक 19 शहापूर येथील प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सविता चंदगडकर-निकम यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. वेदांत फाऊंडेशन व गुरुस्पंदन यांच्यावतीने हॉटेल न्यू उदय भुवन येथे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेखर करंबळकर तर प्रमुख अतिथी म्हणून वेदांत फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्री पाटील , सतीश पाटील , लक्ष्मणराव निकम , आप्पाणा येळ्ळूरकर , आस्मा नाईक , आनंद काद्रोळी , संजय चिगरे , माधुरी , सुनिल देसुरकर , असीफ अत्तार, देवेंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते .

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दोन अंत्यंत महत्वाच्या तारखा असतात एक तारीख असते ती त्याच्या प्रवासाची सुरुवात करणारी आणि दुसरी तारीख त्या प्रवासाला सन्मानाने पुर्णविराम देणारी.
नव्या जोमात आणि उत्साहात 8 ऑगस्ट 1994 रोजी शिक्षक सेवेची झालेली सुरुवात 32 वर्षानंतरही तोच उत्साह टिवकवून शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करताना जीव लावणाऱ्या सविता चंदगडकर- निकम ह्या  एकमेव शिक्षिका आहेत असे गौरवोद्गार शेखर करंबळकर यांनी यावेळी बोलताना काढले .

यावेळी सत्कारमूर्ती सविता चंदगडकर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, शिक्षकी सेवा हा  व्यवसाय नसून एक भावना आहे, एक कर्तव्य आहे. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानदानाचे बीज पेरतो तेंव्हा त्या सोबतच विद्यार्थ्यांच्या ध्येयाची ,भविष्याची स्वप्न पेरत असतो. याची जाणीव करून घेत मी 32 वर्षे कार्य केले. या सेवेबद्दल माझा इथं सन्मान होत असून या सन्मान सोहळ्याबद्दल मी आपली ऋणी आहे .
 प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदांत फाउंडेशनचे संस्थापक  सतीश पाटील यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत मारूती तमुचे यांनी केले .कार्यक्रमात मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा अंबेवाडीकर यांनी केले तर जयश्री पाटील यांनी आभार मानले .
यावेळी शेकडो शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते .

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
राज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद