गोवा : भीषण अपघातात 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मष्णू गावडा ( राहणार - अनमोड, सध्या राहणार कुळे-गोवा ) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रविवारी दुपारी गोव्यातील कुळे येथे झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
गवंडी काम करणारे मष्णू गावडा हे मूळचे अनमोड येथील असून गेली दहा वर्षे ते आपल्या कुटुंबासह गोव्याच्या कुळे गावात राहात होते. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ते शिगाव येथून केए 30 क्यू 1957 क्रमांकाच्या दुचाकीवरून कुळे येथे परतत होते. यावेळी एका वळणावर समोरून भरधाव वेगात आलेल्या एमएच 09 इजी 1566 क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की मष्णू गावडा यांचा जागीच मृत्यू झाला.
मष्णू गावडा यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.
कुळे पोलिसांनी कारचालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक गवस करीत आहेत.
[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]