LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार ...!

छत्तीसगड : सहा वर्षाच्या चिमुरड्या पोरीवर नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला आणि स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी तिचा मृतदेह शेजारील लोकांच्या कारमध्ये लपवला.


पण, गुन्हा आणि गुन्हेगार पोलिसांच्या नजरेतून कधीच लपून राहत नाही. पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या असून धक्कादायक बाब म्हणजे तो नराधम त्या चिमुरड्याच्या नात्यातीलच असल्याचे समजते. ही घटना छातीसगड येथे घडली आहे.


कन्या भोज' कार्यक्रमासाठी ती चिमुरडी आजीच्या घरी गेली होती. सायंकाळ झाली तरी ती घरी आली नाही. कुटुंबियांनी शोधाशोध करूनही पोर सापडली नाही.. यामुळे पोलिसात फिर्याद देण्यात आली. पोलीस आणि कुटुंबातील लोक त्या मुलीचा शोध घेत असतानाच तिचा मृतदेह शेजाऱ्यांच्या गाडीच्या डिक्कीत आढळला.
पोलिसांना या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही माहिती मिळाली आणि त्यांनी त्रिकुटाला ताब्यात घेतले. त्यातील दोन जणांना चौकशीनंतर सोडण्यात आले. मात्र, मुलीच्या नात्यातील सोमेश यादव नामक व्यक्ती पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात अडकली.


त्याची कसून चौकशी केली असता सत्य बाहेर पडले. सोमेश यादवने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर पुरावा लपवण्यासाठी गाडीत मृतदेह ठेवल्याचे चौकशी दरम्यान सांगितले.


घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मोहन नगर पोलीस ठाण्याबाहेर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. निदर्शकांनी दगडफेक केली आणि एका पोलिस वाहनास आग लावली. या घटनेनंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.


छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत, ही अमानवी घटना असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.
हा प्रकार संपूर्ण राज्याला हादरवून गेला असून, आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती