LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

तोराळी सीआरपीएफ कोब्रा प्रशिक्षण केंद्रातून झाला जवान बेपत्ता

खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी परिसरातील तोराळी गावाजवळील सीआरपीएफ कोब्रा कमांडो प्रशिक्षण केंद्रातून एक जवान बेपत्ता झाला आहे.. यासंबंधी खानापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.


एम. रतन बाबू (वय 39 ) असे बेपत्ता झालेल्या त्या जवानाचे नाव असून तो आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील रेपल्ली तालुक्यातील भट्टीपरुलू गावचा रहिवासी आहे.
मागील दोन महिन्यांपासून तोराळी येथील सीआरपीएफ कोब्रा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेला जवान एम. रतन बाबू हा सोमवारी दिनांक 14 एप्रिल 2025 पासून बेपत्ता आहे.
14 रोजी सकाळी 6.30 वाजता आपल्या जनरल ड्युटीवर होता. तेथून तो अचानक बेपत्ता झाला. याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोब्रा कमांडो प्रशिक्षण केंद्राचे उपकमांडर मनीष कुमार यांनी सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना सांगितले की, जवान एम. रतन बाबू हे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता आणि कोणालाही माहिती न देता केंद्रातून बेपत्ता झाले आहेत.


या संदर्भात जर कुणाला काही माहिती मिळाल्यास, खानापूर पोलीस ठाण्याशी अथवा तोरळी येथील कोब्रा कमांडो प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती