चिक्कनायकनहळ्ळी : मित्राच्या वाढदिनानिमित्त देवदर्शनासाठी जात असताना झालेल्या कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. कर्नूलजवळ रविवारी रात्री ही घटना घडली आहे.
नवीण, संतोष आणि लोकेश ( सर्वजण राहणार चिक्कनायकनहळ्ळी, तालुका केंकेरे, आंध्रप्रदेश) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
संतोषच्या वाढदिनाचे औचित्य साधून त्याच्या मित्रांनी मंत्रालय आणि श्रीशैल यात्रेचे आयोजन केले होते. त्यानुसार संतोष आणि त्याचे मित्र पर्यटनासाठी निघाले. श्रीशैलकडे जात असताना कर्नूलजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यांच्या कारने रस्त्याच्या डिव्हायडरला जोरदार धडक दिली. यात नवीण, संतोष आणि लोकेश या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
नवीण हे चिक्कनायकनहळीतील भाजपचे माजी तालुका पंचायत अध्यक्ष होते, तर संतोष हे तुमकूर भाजप जिल्हा घटकाचे सचिव म्हणून कार्यरत होते. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.