LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आयपीएल क्रिकेट बेटिंग : मुंडगोडमध्ये एकास अटक, तिघे फरार

उत्तर कन्नड : आयपीएल 2025 च्या राजस्थान विरुद्ध पंजाब सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या चौकडीचा तपास मुंडगोड पोलिसांनी लावला असून यांपैकी एकास ताब्यात घेण्यात आले असून तिघेजण पोलिसांच्या हातून निसटले आहेत.


मंजीनाथ कोरव (वय 33, राहणार डॉ. आंबेडकर गल्ली मुंडगोड) असे पोलिसांनी चतुर्भुज केलेल्या आरोपीचे नाव असून आनंदनगर येथील वेंकटेश अरिवाण (वय 32), गडग येथील मंजीनाथ आसंगी (वय 30) आणि सांचि गल्ली येथील हरीश बाळेम्मनवर (वय1 28) हे तिघेजण पोलिसांच्या हाती तुरी देऊन निसटले आहेत.


मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून मुंडगोड पोलिसांनी मुंडगोड येथील केएसआरटीसी बसस्थानकाजवळ ही कारवाई करतआरोपींकडून 2,300 रुपये रोख रक्कम, लावा कंपनीचा मोबाईल फोन, बेटिंगसंदर्भातील नोंदी असलेली वही व पेन जप्त केले आहेत.


जिल्हा पोलीस अधीक्षक एम. नारायण, एचएसपी कृष्णमूर्ती आणि डीएसपी गणेश के.एल. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ नीलमण्णवर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती