LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

चोरट्यांनी फोडले एटीएम मशीन : चोरली 18 लाखांची रक्कम : भल्या पहाटे मारला डल्ला

कलबुर्गी : झटपट पैशासाठी चोरट्यांनी थेट एटीएम मशीन फोडून 18 लाखांची रोकड पळविली. कलबुर्गी शहरातील रिंगरोडवर आज भल्या पहाटे 4 च्या दरम्यान चोरट्यांनी हा कारनामा केला.
खबरदारी म्हणून चोरट्यांनी एटीएम सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना काळा स्प्रे मारून निकामी केले. त्यामुळे सीसीटीव्ही कुचकामी ठरली. आणि मग चोरट्यांनी आपले काम बिनभोबाटपणे केले.


पहाटे 4 च्या दरम्यान लोक साखर झोपेत असताना चोरटे कलबुर्गी शहरातील रिंगरोडवरील रामनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएम सेंटरमध्ये शिरले. आपली छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये याची पुरेपूर दक्षता म्हणून चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून कॅमेरे निष्क्रिय केले. यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम यंत्र फोडले आणि मशिनमधील 18 लाखांची रोकड घेऊन पोबारा केला.


बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता मशीनमध्ये रोकड भरली होती. ती बुधवारी भल्या पहाटे चोरट्यांनी रिकामी केली. सब अर्बन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती