LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

चोरट्यांनी चोरी केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी पेटवले घर ..!

कोलार : चोरट्यांनी एका गरीबाच्या घरात चोरी केली आणि ऐवज लंपास केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग लावून घरच पेटवून दिले. चोरट्यांच्या या निर्दयीपणामुळे एक संसार उघड्यावर आला.
कोलार जिल्ह्यातील मल्लसंद्र गावात ही घटना घडली आहे.


मल्लसंद्र गावातील शारदम्मा ह्या कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री तिच्या घराचा कडी कोयंदा तोडून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या चोरट्यांनी घरातील तिजोरीचे लॉकर फोडून त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले.
लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लुटल्यानंतर फिंगर प्रिंट आदी पुरावे नष्ट करण्यासाठी घरालाच आग लावून घर पेटवून दिले.
शारदम्मा ही उदरनिर्वाहासाठी चहाचे दुकान चालवते. घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरीनंतर घर पेटवून दिल्याने एक गरीब कुटुंब आता अक्षरशः उघड्यावर आले आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी घरातील किराणा सामानासह सर्व आवश्यक वस्तू जळून खाक झाल्या. या प्रकरणाची नोंद वेमागल पोलीस स्थानकात करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती