LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

तुरमुरी येथील कचरा विल्हेवाट घटकाला ग्रामस्थांचा विरोध : काढला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांच्या निवासस्थानावर मोर्चा : केली कचरा डेपो हलवण्याची मागणी

बेळगाव : तुरमुरी गावातील बेळगाव महानगरपालिकेचा कचरा विल्हेवाट घटक तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढून महिला व बाल विकास मंत्री आणि बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे निवासस्थान गाठून मंत्री महोदयांना निवेदन दिले.


सन 2006 पासून गावकरी तुरमुरी येथील कचरा विल्हेवाट युनिटला विरोध करत आहेत. या कचरा विल्हेवाट घटकामुळे आजूबाजूच्या गावांना त्रास होत आहे. या कचरा डेपोमुळे वातावरण प्रदूषित होत असून गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. याची गांभीर्याने दखल घेत हा कचरा विल्हेवाट घटक तात्काळ रद्द करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी मंत्री हेब्बाळकर यांच्याकडे केली.
कचरा विल्हेवाट युनिटमुळे या भागात विविध समस्या निर्माण झाल्या असून येत्या काही दिवसांत पाईपलाईनदेखील दूषित होण्याची शक्यता आहे, असे काडाचे अध्यक्ष युवराज कदम यांनी मंत्री हेब्बाळकर यांना सांगितले.


मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तात्काळ नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांना व्हिडिओ कॉल करून कचरा विल्हेवाट घटक तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी जमलेली गर्दी दाखवली आणि निर्माण झालेली समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी बोलताना, नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी, या प्रकरणी विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण भागात कचरा टाकणाऱ्या बेळगाव महापालिका अधिकारी, महापौर-उपमहापौर, शहरी आमदार- खासदारांनी ग्रामीण जनतेला काय दिले आहे आहे ? ग्रामीण भागातील लोकांना त्रासदायक ठरत असलेला हा कचरा घटक हलविण्याची जबाबदारी त्यांची नाही का ? असा सवाल करत
गावकऱ्यांनी दक्षिण-उत्तरचे आमदार, खासदार, महापौर आणि उपमहापौर यांच्या घरासमोर कचरा टाकून कचरा विल्हेवाट युनिटविरोधात आंदोलन करावे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून द्यावी. असे मंत्री हेब्बाळकर मोर्चेकऱ्यांशी बोलताना म्हणाल्या.
यावेळी तुरमुरीसह आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती