LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बसची धडक बसून पोलीस उप निरीक्षकासह दोघांचा मृत्यू

कनकपूर : बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पोलीस उप निरीक्षकासह दोघांचा मृत्यू झाला.
बेंगळूर-कनकपूर रस्त्यावर आज सोमवारी सकाळी हा भीषण अपघात घडला.




 

आज सकाळी केएसआरटीसी बस कनकपूर येथून बेंगळूरच्या दिशेने चालली होती. कग्गलीपूर पोलीस ठाण्याजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या बाईकवर धडकली. यामध्ये बाईकचालक नागराज आणि दुचाकीच्या मागील आसनावर बसलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या अपघातात आणखीन एक जण ठार झाला.
अपघातात ठार झालेले दुचाकीचालक नागराज हे इलेक्ट्रॉनिक सिटी ट्रॅफिक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होते.


दुचाकीला धडक दिल्यानंतर बस रस्त्याशेजारील खोल खड्यात कोसळली. या घटनेतचार जण गंभीर जखमी झाले.
जखमींपैकी एकाची स्थिती चिंताजनक असून त्याला निम्हान्स (NIMHANS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित तिघांना दयानंद सागर रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती