LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' हिट अँड रन ' : लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गाडीला ठोकरून फरार झालेला ट्रक चालक चतुर्भुज

बेळगाव : महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला धडक देऊन पोबारा केलेल्या ट्रक चालकाच्या मुसक्या पोलिसांनी तब्बल 3 महिन्यांनी आवळल्या.
मधुकर कोंडीराम सोमवंशी (वय 65, राहणार तक्कारवाडी,तालुका-इंदापूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र ) असे तीन महिन्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.


14 जानेवारी रोजी कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी गावाजवळ इंदापूरच्या मधुकर कोंडीराम सोमवंशी नावाच्या ट्रक चालकाने महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला ठोकर देऊन पोबारा केला होता. याप्रकरणी हेब्बाळकर यांच्या वाहनचालकाने कित्तूर पोलीस ठाण्यात "हिट अँड रन"चा गुन्हा नोंदवला होता.



गुन्हा नोंदवून घेऊन पोलिसांनी अपघात स्थळी सापडलेल्या पुराव्यांमध्ये ट्रकच्या रंगाचा नमुना, तसेच अन्य महत्त्वाची माहिती एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) कडे पाठविण्यात आली होती.
त्याचबरोबर, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात आली होती. या आधारे ट्रकचा शोध घेण्यात आला आणि अखेर तीन महिन्यांनी पोलिसांनी चालकाच्या मुसक्या आवळल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती