LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जावयाने सासूवर केले चाकूने सपासप वार : ‘आज जेल, उद्या बेल ’ : ठेवला मोबाईल स्टेटस

बेळगाव : किरकोळ कारणावरून जावयाने सासूवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील आळदकट्टी येथे घडली आहे.
अरविंद गवळी असे सासूवर चाकूने वार करणाऱ्या जावयाचे नाव आहे.


अरविंद गवळीच्या पत्नीला दोन महिन्यांपूर्वीच बाळ झाले असून ती सध्या माहेरी राहते. यामुळे अरविंदने सासरी व्हिडिओ कॉल करून बाळाला पाहण्याची ईच्छा व्यक्त केली. यावेळी सासूने अरविंदला व्हिडिओ कॉलवर बाळ दाखवण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या अरविंदने सासर गाठून सासू महादेवी (वय 45) यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महादेवीला उपचारासाठी त्वरित इस्पितळात नेण्यात आले. तिच्यावर इस्पितळात अतिदक्षता विभागात उपचार आहेत. पोलिसांनी आरोपी अरविंद गवळीला अटक केली आहे.


अरविंद वारंवार व्हिडिओ कॉल करून बाळ दाखवण्याचा आग्रह धरत होता. यावर सासू महादेवी यांनी, "सतत मोबाईलवर बसणे शक्य नाही, दिवसातून एकदाच फोन कर," असे सांगितले होते. इतके सांगूनही अरविंदने पुन्हा सासरी फोन करून बाळाला पाहण्याची ईच्छा व्यक्त केली. यामुळे सासूने त्याला व्हिडिओ कॉलवर बाळ दाखवण्यास नकार दिला. या कारणावरून संतापलेल्या अरविंदने सासूला शिवीगाळ केली. त्यावर महादेवी यांनीही "घराच्या दारात आलास तर तुला सोडणार नाही," असा इशारा अरविंदला दिला. या रागातूनच अरविंदने सासूचे घर गाठले आणि सोबत नेलेल्या चाकूने सासुवर वार केला. काम फत्ते करून तेथून पळ काढला.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महादेवी यांना उपचारासाठी बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.


‘आज जेल, उद्या बेल’ :
सासूवर चाकूने वार करून पळ काढलेला अरविंद इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मोबाईल व्हॉट्सअपवर "आज जेल, उद्या बेल... पण, तुला सोडणार नाही " असा स्टेटस ठेवून सासूला अप्रत्यक्षरीत्या धमकावत आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. घटनेनंतर तत्काळ कारवाई करत मुरगोड पोलिसांनी आरोपीला अटक करून कारागृहात धाडले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती