LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

माती ढासळली आणि दोन कामगार मातीत गाढले गेले ..!

बेळगाव : पाईपलाईन घालण्याचे काम सुरू असताना अचानकपणे माती ढासळली आणि त्या मातीखाली दोघे कामगार गाढले गेले..
न्यु गांधीनगरनजिक राष्ट्रीय मार्गाशेजारच्या हॉटेल पै जवळील सर्विस रोडवर ही घटना घडली आहे


या घटनेत मरण पावलेले बसराज सरवी (वय 38) आणि शिवलिंग सरवी (वय 20) हे दोघेही राहणार मूडलगी तालुक्यातील पटगुंडी गावचे रहिवासी होते.


आज बुधवारी कर्नाटक राज्य पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागातर्फे या भागात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी बसराज सरवी आणि शिवलिंग सरवी हे पाईप टाकण्यासाठी खणलेल्या चरित उतरून काम करीत होते. यावेळी अचानक माती ढासळली आणि त्या मातीखाली दोघे कामगार गाढले गेले.


घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या इतर कामगार व स्थानिक नागरिकांनी मातीखाली गाढल्या गेलेल्या त्या दोन कामगारांना मातीच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, काही उपयोग झाला नाही.



काही वेळाने जेसीबीच्या सहाय्याने माती बाजूला करण्यात आली आणि दोघांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.


घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळी जमलेल्या बघ्यांची गर्दी हटवली.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती