LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

युवकांचे प्रसंगावधान : वाचविला वृद्धाचा जीव

बेळगाव, दिनांक 19 ( प्रतिनिधी) : आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उचगाव जवळील मार्कंडेय नदी पात्रात उडी घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा जीव उचगावचा विशाल हंडे आणि अतवाडचा यतेश हेब्बाळ या दोन युवकांनी वाचविला. अन्यथा अनर्थ घडला असता.


गांधीनगर - बेळगाव येथे राहणारी तुकाराम नामक व्यक्ती आज सोमवारी सकाळी उचगाव नजीकच्या मार्कंडेय नदी पुलावरुन नदीत उडी घेण्याच्या प्रयत्नात होती. याचवेळी त्या मार्गावरून चाललेल्या विशाल हंडे व यतेश हेब्बाळ यांनी वृद्धाने आत्महत्या करण्यासाठी चालविलेली धडपड पहिली आणि धावत जाऊन नदीत उडी घेण्यासाठी पुलावरील रेलिंगवर चढलेल्या त्या वृद्धाला खाली खेचून आणले.


यावेळी त्या युवकांनी वृद्धाची विचारपूस केली असता आपण जीवनाला कंटाळून नदीत उडी टाकून आत्महत्या करणार होतो, असे सांगितले. विशाल व यतेश यांनी त्या वृद्धाच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्या वृद्धाला घरच्या लोकांकडे पोहोचविल्याचे समजते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती