LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

धडाकेबाज आयपीएस अधिकारी 15 वर्षानंतर पुन्हा येतोय बेळगावात ..!

बेळगाव : 2010 ते 2013 या कालावधीत बेळगावचे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावलेले संदीप पाटील तब्बल 15 वर्षांनंत उत्तर कार्यक्षेत्राचे आयजीपी म्हणून पुन्हा एकदा बेळगावात सेवा बजावण्यासाठी येत आहेत.


कर्नाटक सरकारने 6 मे 2026 रोजी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, विद्यमान आयजीपी डॉ. चेतनसिंग राठोड यांची बदली बेंगळूर येथे गुप्तचर विभागात करण्यात आली असून त्यांच्या जागी आता संदीप पाटील बेळगावची सूत्रे हाती घेणार आहेत.


बेळगावच्या इतिहासात पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पदोन्नतीवर ‘आयजीपी’ सेवा बजावणारे ते पहिलेच वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत.


बेळगावमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची घडी सुरळीत बसविली होती. एक कर्तव्यदक्ष, धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी बेळगावमध्ये आपली छाप पाडली होती. अल्पावधीतच ते बेळगावकरांचे लाडके अधिकारी बनले. मात्र, सारे काही सुरळीत चालले असताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीमुळे संतापलेले हजारो नागरिक “संदीप पाटील यांची बदली रद्द करा” या मागणीसाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. यावेळी जिल्हाधिकारी कचेरीवर विराट मोर्चा काढला गेला होता आणि एका आयपीएस अधिकाऱ्यांची बदली रोखण्यासाठी बेळगाव शहरात काढलेला सर्वधर्मीयांचा तो सर्वात मोठा मोर्चा होता.
बेळगावमधून बदली झाल्यानंतर 15 वर्षांत त्यांनी बेंगळूर शहर आणि राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात अनेक महत्त्वाची पदे भूषवली.
आणि आता ते तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा बेळगावात आयजीपी म्हणून सेवा बजावण्यासाठी परतत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती