LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कॉलेज विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल : लावून घेतला गळफास

चिक्कोडी : मुलाने शिकावे, मोठे व्हावे असे कोणत्या आई-वडिलांना वाटत नाही ? आपल्या मुलाने चांगले शिकावे, चांगले संस्कार घ्यावे ही प्रत्येक पालकांची ईच्छा असते. त्या अनुषंगाने पालक आपल्यापरिने मुलांना उपदेश वजा सल्ला देत असतात. पण पालकांचा हा सल्ला साऱ्याच मुलांच्या पचनी पडेल असे म्हणता येणार नाही.
अशाच प्रकारचा सल्ला आई-वडिलांनी मुलाला दिला आणि हा सल्ला मुलाच्या मनाला लागला. मुलाने टोकाचे पाऊल उचलत जीवनच संपविले.



कॉलेजला व्यवस्थित जाण्याबाबत आई-वडिलांनी मुलाला समज दिल्याने नाराज झालेल्या युवकाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.


बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात ही घटना घडली आहे. सागर तुकाराम कुराडे (वय 20) असे त्याचे नाव असून तो सदलगा येथील शासकीय महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.


काही दिवसांपासून तो कॉलेजला दांडी मारून बाहेर फिरत होता. याबद्दल कळताच पालकांनी त्याला समज दिली. मात्र, याच गोष्टीचा मनावर ताण घेत त्याने घराशेजारी असलेल्या जागेत गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची नोंद चिक्कोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


तरुणाई मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चालली आहे.. सहनशीलतेची सीमाही त्यांच्यात दिसेनाशी झाली आहे. संकटांना सामना करण्याची, आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य ही पिढी गमावून बसली आहे. ही चिंतनीय बाब असून यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती