खानापूर : शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मलप्रभा नदी पात्रात बुडालेल्या लोकोळीच्या ' त्या' युवकाचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. आता रविवार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा मृतदेह शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
[video width="848" height="478" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/10/VID-20251025-WA0015.mp4"][/video]
प्रथमेश रवींद्र पाटील (वय 18) हा युवक खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील मलप्रभा नदीत शुक्रवारी सायंकाळी बुडाला होता. शनिवारी खानापूर पोलिसांनी बेळगाव येथील एचईआरएफ (HERF) रेस्क्यू टीमच्या सहाय्याने प्रथमेशचा मृतदेह शोधण्याचे कार्य हाती घेतले होते. स्थानिक तरुणही या मोहिमेत सहभागी झाले होते. दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, मृतदेह हाती लागला नाही.
सायंकाळी अंधार झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.
आता रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशी दिवशी गणेश मूर्ती विसर्जन करताना यडोगा बंधारा परिसरात एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. दीड-दोन महिन्यापूर्वीची ही घटना ताजी असतानाच आता लोकोळी मलप्रभा नदी पात्रात 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे.
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.