LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शिवारात आढळला मृतदेह : दगडाने ठेचून करण्यात आलाय खून !

बेळगाव ( bn7 news) : 48 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना खानापूर-एम के हुबळी मार्गावर खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावच्या हद्दीत उघडकीस आली आहे.


शिवनगौडा इरनगौडा पाटील ( राहणार बलोगा, तालुका खानापूर) असे त्या व्यक्तीचे नाव असून गाडीकोप गावच्या हद्दीतील शिवारात त्याचा मृतदेह मिळाला आहे. मृताचा भाऊ सन्नगौडा इरनगौडा पाटील याने खानापूर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे.


दास्तीकोप्प येथे शिवनगौडा याची मेव्हणी राहते. गावची यात्रा सुरू असल्याने शिवनगौडा आपल्या पत्नीसह मेव्हनीकडे यात्रेसाठी आला होता. काल मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी पत्नी आणि मेहुणीला त्याने आपल्या गावी बलोगा येथे जाऊन येतो असे सांगून रात्री तो मेव्हणीच्या घरातून बाहेर पडला. पण तो बलोग्याला पोहोचलाच नाही.
बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह गाडीकोप गावच्या इराप्पा जोळद यांच्या शेतवडीत आढळला.
कोणा अज्ञाताने शिवनगौडा याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे दिसून आहे. त्याच्या डोक्यावर व डाव्या बाजूच्या कानावर दगडाने वार करण्यात आले होते.


खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय एल एच गवंडी व पीएसआय एमबी बिरादार याचा तपास करीत आहेत

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती