LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

एनकाउंटर'द्वारे त्या आरोपीला शिक्षा : शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांची प्रतिक्रिया

शिवमोग्गा – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा होणे गरजेचे होते. यामुळे एनकाउंटर'द्वारे त्या आरोपीला शिक्षाच झाल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी व्यक्त केली आहे.
हुबळीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 'एनकाउंटर'मध्ये ठार केल्याच्या घटनेवर शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.


शिवमोग्गा येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अशा आरोप्याला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे आणि ती 'एनकाउंटर'च्या रूपात झाली आहे. जनतेची प्रतिक्रिया देखील आपण ऐकली आहे. अशा घटनेचा कोणत्याही राजकीय पक्षापलीकडे, जातीयतेच्या पलिकडे जाऊन निषेध झाला पाहिजेत.. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारसह सामान्य नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. या घटनांविषयी निष्पाप मुलांना जागरूक करणे गरजेचे आहे. पालक, शिक्षक व सरकार अशा सर्वांनी ही जबाबदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.


बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाईचे संकेत :


राज्याबाहेरून आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या उपस्थितीवर भाष्य करताना बंगारप्पा म्हणाले की, कोणताही व्यक्ती राज्यात आला तरी त्याचे योग्य पद्धतीने नोंद असणे आवश्यक आहे. कायदेशीररित्या त्यांची ओळख पटविणे गरजेचे आहे. यासाठी विविध सरकारी विभागांच्या माध्यमातून कार्यवाही केली जाईल. मी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी याबाबत चर्चा करीन आणि हे प्रकरण सरकारच्या निदर्शनास आणून देईन.


जातगणनेवर भाष्य :


जातगणनेच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, जातगणना प्रसिद्ध झाली आहे पण अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. उपमुख्यमंत्री यांनी देखील अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. उशीर झाला असला तरी आमचे सरकार या दिशेने काम करत आहे. विशेष मंत्रिमंडळ बैठक बोलावण्यात आली आहे आणि चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


शैक्षणिक तयारी पूर्ण : शालेय पुस्तके तयार


मुलांच्या शिक्षणावर बोलताना मंत्री बंगारप्पा यांनी सांगितले की, आगामी शैक्षणिक वर्षासाठी पाठ्यपुस्तकांची तयारी पूर्ण झाली आहे. शिक्षण विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. विशेषतः द्वितीय पीयूसी (PUC) च्या पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन संधी दिल्या जातील. या परीक्षेचे शुल्क म्हणजे 400 रुपये सरकारकडूनच भरले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती